‘देवी’चा ट्रेलर पाहिलात का ? काजोल सोबत झळकणार हे चार मराठी कलाकार     

By  
on  

अभिनेत्री काजोल एक लघुपटातून समोर येत आहे. या लघुपटात काजोल सोबत चार दिग्गज मराठी कलाकारही झळकणार आहेत. अभिनेत्री मुक्ता  बर्वे, नीना कुळकर्णी, संध्या म्हात्रे, रमा जोशी हे मराठीतील दिग्गज कलाकार या लघुपटात दिसतील. शिवाय नेहा धुपिया, श्रुती हसन, शिवानी रघुवंशी, यशस्वी दयामा हेही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

नुकताच या लघुपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या ट्रेलरमध्ये या प्रत्येक अभिनेत्रीच्या प्रभावी भूमिका असल्याचं जाणवतयं. मुक्ता बर्वे या लघुपटात मुस्लिम महिलेच्या भूमिकेत दिसेल. तर अभिनेत्री नीना कुळकर्णी आणि संध्या म्हात्रे या मराठी भाषिक महिला दाखवल्या आहेत. काजोलचाही साधा लुक या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरमधून प्रत्येक भूमिकेला अधोरेखित करण्यात आलेलं आहे.   


येत्या 2 मार्चला हा लघुपट प्रदर्शित होणार आहे.    


 

Recommended

Loading...
Share