By  
on  

‘५ चा चहा’ ऑनलाईन कार्यक्रम चर्चेत, हे कलाकार सादर करतात कार्यक्रम

लॉकडाउनमध्ये मनोरंजनासाठी विविध पर्याय सध्या उपलब्ध आहेत. टेलिव्हिजन कार्यक्रम, वेब सिरीज तर आहेतच पण त्याशिवाय आता सोशल मिडीयावरही विविध कार्यक्रम सादर केले जात आहेत. 

मनोरंजन विश्वातील कलाकार लाईव्ह येऊन गाणी, शायरी, काव्यवाचन सादर करुन प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. त्यातच विविध ऐपच्या मदतीने कला समूहाने सादर करण्याचे आणि चर्चा करण्याचेही विविध पर्यात उपलब्ध आहेत. यातच ‘५ चा चहा’ या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा आहे. या कार्यक्रमात दिगपाल लांजेकर, अजय पुरकर, हरीश दुधाडे, चिन्मय मांडलेकर या कलाकारांचा सहभाग असतो. शिवाय इतर कलाकार पाहुणे म्हणून प्रत्येक भागात सहभागी होत असतात. थिएट्रॉन आणि रिमा क्रिएशन्सचा हा कार्यक्रम आहे. यावेळी एकाच वेळी ही सगळी कलाकार मंडळी एकत्र सहभाग घेऊन कार्यक्रमात रंगत आणतात. आत्तापर्यंत सादर केलेल्या या कार्यक्रमाच्या विविध भागात बऱ्याच कलाकारांनी सहभाग घेतला होता. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

५ चा फक्कड चहा.. उद्या शुक्रवार, १७ एप्रिल संध्याकाळी ५ वाजता उद्या आपल्यासोबत पाहुणे आहेत अभिनेता विघ्नेश जोशी.. भेटूच... चहा सोबत.. फेसबुक वर @Theatronentertainment @rumacreations #5chachaha #theatronentertainment #rumacreationspune #stayhome #staysafe #entertainment #entertainmentcenter #homeentertainment #marathiartists #kalakar #Rangabhumi Live on https://www.facebook.com/Theatron.Theatron/ https://www.facebook.com/rumacreations/

A post shared by Harish Dudhade (@harishh_dd) on

अभिवाचन, गायन, वादन अशाप्रकारची कला सादर करण्याचे विविध कार्यक्रम सध्या ऑनलाईन सुरु करण्यात आले आहेत. शिवाय कोरोना थिएटर या पेजचीही जोरदार चर्चा आहे. या सोशल मिडीया अकाउंटवरही कलाकारांच्या विविध कला पाहायला मिळतात. मनोरंजन विश्वातील विविध कलाकार आणि विशेषकरून नाट्यविश्वातील कलाकार या ऑनलाईन कार्यक्रमांसाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. या कला सादर करण्यासाठी सध्या सोशल मिडीया हा उत्तम पर्याय ठरतोय. 

Recommended

PeepingMoon Exclusive