सध्या घरात बसून नाटगृहे बंद असल्याने नाटक पाहता येत नसलं तरी घर बसल्या ऑनलाईन थिएटर पाहण्याची सोय सुबक निर्मितीने करून दिली. घरात बसून जबरदस्त परफॉर्मन्सचे सामने या उपक्रमातून पाहायला मिळाले आहेत. आणि आता ऑनलाईन माझं थिएटर या ऑनलाईन कार्यक्रमाची स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कार्यक्रमासाठी विविध टीम आखल्या होत्या. त्यापैकी '2 फुल्या 3 बदाम' आणि 'मसाला पान' या दोन टीम महाअंतिम टप्प्यापर्यंत पोहोचल्या आहेत. आणि आता या महाअंतिम सोहळ्यात या कार्यक्रमाचा विजेता ठरणार आहे.
आज आणि उद्या म्हणजेच 25 आणि 26 जुलै रोजी हे महाअंतिम सामने रंगतील. ऑनलाईन माझं थिएटर चे दोन सर्वात यशस्वी संघ शनिवारी आणि रविवारी जेतेपदाचा सामना खेळणार आहेत. या वेळी जेतेपदाचा मान कोणाला मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठऱेल. 2 फुल्या 3 बदामकडे संकर्षण कऱ्हाडे, ऋतुजा बागवे, मयुरी वाघ, गौरी नलावडे आणि आरोह वेलणकर असा तगडा संच आहे. त्यांच्याशी सामना करायचे आव्हान मसाला पान समोर असेल.मसाला पानकडे संदीप पाठक, सुनील अभ्यंकर, प्रिया मराठे, नचिकेत देवस्थळी आणि आरती मोरे सारखे दर्जेदार खेळाडू आहेत.
याशिवाय हा अंतिम सामना रंजक बनवण्यासाठी दोन स्पेशल सेलिब्रिटी परफॉर्मन्सही असणार आहेत. यासाठी अभिनेमात अमेय वाघ आणि निपुण धर्माधिकारी हे परफॉर्मन्स सादर करतील.
अर्थात तिकीट बुक करून या सामन्यांची ऑनलाईन मजा प्रेक्षकांना घरबसल्याच अनुभवता येणार आहे.