‘इतनी शक्ति हमें देना दाता’चे गीतकार अभिलाष काळाच्या पडद्याआड

By  
on  

‘इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना…’ या लोकप्रिय प्रार्थनेने कुठल्याही कार्यक्रमाची सुरेख सुरुवात होते. प्रत्येक शाळांमध्ये प्रार्थनेसाठी हे गीत आवर्जुन  गायलं जातं. याच प्रसिध्द गीताचे  गीतकार अभिलाष यांचं निधन झालं आहे. ते ७४ वर्षांचे होते. ते कॅन्सरने त्रस्त असल्याचं बोललं जात आहे.  उपचारादरम्यान काल रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

अभिलाष हे बॉलिवूडमधील एक प्रसिध्द गीतकार होते. १९८३ साली ‘अंकुश’ या चित्रपटासाठी त्यांनी ‘इतनी शक्ति हमें देना दाता’ ही प्रार्थना लिहिली होती. या प्रार्थनेमुळे ते लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचले. ही प्रार्थना आठ भाषांमध्ये भाषांतरीत झाली असून आजही ती तितकीच लोकप्रिय आहे.

अभिलाष यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीत शोकसागरात बुडाली आहे. 

Recommended

Loading...
Share