पाहा Video : सेटवर अशा थिरकल्या होत्या रेणुका शहाणे आणि माधुरी, वाढदिवसानिमित्ताने माधुरीने पोस्ट केला हा व्हिडीओ

By  
on  

अभिनेत्री रेणुका शहाणे यांचा अभिनय, त्यांनी साकारलेल्या भूमिका या कायमच लक्षवेधी ठरल्या. कायम चेहऱ्यावर सुंदर हास्य असणाऱ्या रेणुका शहाणे यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने अनेक कलाकारांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रेणुका यांना दरवर्षी एका व्यक्तिकडून शुभेच्छा येतातच. ती व्यक्ती म्हणजे बॉलिवुड सुपरस्टार माधुरी दीक्षित. 'हम आप के है कौन' या सिनेमातील माधुरी आणि रेणुका शहाणे या बहिणींची ऑनस्क्रिन जोडी सगळ्यांनाच आवडली होती. 

बऱ्याच वर्षांनंतर या दोन्ही अभिनेत्री पुन्हा एकत्र झळकल्या त्या बकेटलीस्ट या मराठी सिनेमात. या सिनेमातून माधुरीने मराठी सिनेविश्वात पदार्पण केलं. याच सिनेमाच्या सेटवर अचानक लो चली मै हे गाणं वाजवण्यात आलं. मग काय माधुरी आणि रेणुका या दोघीही सेटवरच या त्यांच्या प्रसिद्ध गाण्यावर नाचू लागल्या. हा व्हिडीओ तेव्हा प्रचंड व्हायरल झाला होता. आणि पुन्हा रेणुका शहाणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने माधुरीने रेणुकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 

'हम आप के है कौन' या सिनेमातील लो चली मै हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. या गाण्याची जादू आजही कायम असल्याचं चित्र या व्हिडीओत पाहायला मिळतं. 

Recommended

Loading...
Share