By  
on  

भजन सम्राट अनुप जलोटा शिष्य जसलीन मथारुसोबत अडकले लग्नबंधनात, जाणून घ्या

बिग बॉसच्या घरात जसलीन मथारु आणि भजन सम्राट अनुप जलोटा या आगळ्या जोडीच्या प्रेमकहाणीने मनोरंजन विश्वासह सर्व प्रेक्षकांनासुध्दा हादरुन सोडलं होतं. बिग बॉसच्या त्या पर्वात फक्त हे दोघंच विविध कारणांनी चर्चेत राहिले होते. पण आता इतक्या दिवसांनी पुन्हा ही हटके जोडी चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसंच सनसनाटी आहे. जसलीन मथारु आणि अनुप जलोटा यांच्या लग्नाचा एक फोटो सोशल मिडीयावर भलताच व्हायरल होतोय. महत्त्वाचं म्हणजे हा फोटो खुद्द जसलीननेच शेअर केला आहे. लागला  ना 440 वॉल्टचा झटका. पण खरं जाणून घ्यायंचंय ना तुम्हाला  ...आम्ही सांगतो.

जसलीनने तिचा आणि अनुप जलोटा यांच्या लग्नाचा फोटो शेअर करण्यामागचं कारण हे आहे की, दोघांच्याही एका आगामी प्रोजेक्टसंदर्भातला हा फोटो आहे. तो खराखुरा अजिबातच नाही. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

@anupjalotaonline

A post shared by Jasleen Matharu ਜਸਲੀਨ ਮਠਾੜੂ (@jasleenmatharu) on

 

'वो मेरी स्‍टूडेंट है' ह्या आगामी सिनेमातून ही हटके जोडी प्रेक्षकांसमोर येण्यास सज्ज झाली आहे. याच सिनेमातला हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. हा दोघांचा डेब्यू सिनेमा आहे,. प्रत्यक्ष आयुष्यात जसलीन ही जलोटा यांच्यापेक्षा वयाने 37 वर्षांनी लहान आहे. आता या दोघांच्या प्रेमकहाणीवर सिनेमा येतोय हे ऐकून तुम्ही चक्रावून गेला असणार यात शंका नाही. 
 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive