By  
on  

अखेर प्रतिक्षा संपणार ! अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर येतोय आज

अखेर प्रतिक्षा संपली. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर बहुचर्चित लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा ट्रेलर आज दुपारी 12.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. हेच सांगण्यासाठी सिनेमातील एक हटके पोस्टर शेअर करत आम्हीसुध्दा ट्रेलरची वाट बघतोय अशा आशयाची पोस्ट अक्षयने नुकतीच केली आहे.

आज 9 ऑक्टोबरला लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरचा होणार सर्वांच्या घरी धमाका. बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने ट्विट करत चित्रपट ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. हा सिनेमा डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येतोय.  तसंच आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

या सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने यांनी केले असून अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील 

 

 

 

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा ‘कंचना ’ या तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेंमा आहे. यात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो असं काहीसं कथानक ह्यात आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive