By  
on  

आला रे आला ! यंदाची दिवाळी धमाकेदार करायला अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चा ट्रेलर आला

अखेर प्रतिक्षा संपली. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी स्टारर बहुचर्चित लक्ष्मी बॉम्ब सिनेमाचा ट्रेलर आज  प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.आज 9 ऑक्टोबरला लक्ष्मी बॉम्बच्या ट्रेलरचा सर्वांच्या घरी धमाका झाला आहे. 

या सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने यांनी केले असून अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यात मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. ह्या सिनेमाचा ट्रेलर 3.15 मिनीटांचा आहे.  बहुधा बॉलिवूडमधील इतर सिनेमांपेक्षा खुप मोठा ट्रेलर आहे. ह्या हॉरर कॉमेडीपटात अक्षय व कियारा यांच्यासह तुषार कपूर, शरद केळकर आणि अश्विनी कळसेकर आदी कलाकारांच्या अफलातून अभिनयाचा धमाका पाहायला मिळतोय. 

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय कुमारने यापूर्वी  ट्विट करत हा सिनेमा ९ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले होते. हा सिनेमा डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रसिकांच्या भेटीला येतोय.  तसंच आता हा सिनेमा परदेशातही प्रदर्शित होणार आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा सिनेमा ‘कंचना ’ या सुपरहिट तामिळ सिनेमाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी सिनेंमा आहे. यात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो असं काहीसं कथानक ह्यात आहे, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive