By  
on  

सिनेमागृह सुरु झाल्यानंतर 'खाली पीली' ठरणार प्रदर्शित होणारा पहिला सिनेमा

आता लवकरच सिनेमागृह सुरु होत आहेत. अर्थातच नियम व अटी पाळूनच. येत्या 15 ऑक्टोबरपासून सिनेमागृह सिनेरसिकांसाठी खुली होतील. गेले सहा महिने बंद असलेले थिएटर्स आता पुन्हा सुरु होणार असल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे. 

ईशान खट्टर आणि अनन्या पांडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'खाली पीली' सिनेमाची बरीच चर्चा रंगली होती. काही दिवसांपूर्वीच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. पण सिनेमागृह सुरु झाल्यानंतर तिथे प्रदर्शित होणारा 'खाली पीली' हा पहिला सिनेमा ठरतोय.

याशिवाय या सिनेमात मराठमोळा अभिनेता सुयश टिळकची महत्त्वाची भूमिका आहे. सुयश या सिनेमात मंग्या नावाचं पात्र साकारतोय. सुयशच्या या भूमिकेला ओटीटीवर प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.

 

 

 

केंद्र सरकारनं देशभरात चित्रपटगृहं सुरू करण्याची परवानगी दिली असून  १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहं सुरु करण्यास मान्यता दिली आहे. पण एकप्रकारे सिनेमागृह व्यावसायिकांसाठी आणि प्रेक्षकांसाठी मात्र ही आनंदाचीच बाब आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive