By  
on  

ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’मध्ये आता अजय देवगणची वर्णी? दिसणार या भूमिकेत

 ‘तानाजी:द अनसंग वॉरिअर’ फेम दिग्दर्शक ओम राऊत आता आदिपुरुष या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. पौराणिक कथेवर हा सिनेमा बेतला आहे. या सिनेमात प्रभास श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारताना दिसतो आहे. खुद्द ओम राऊत यांनीच ही बाब स्पष्ट केलं आहे. याशिवाय सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे.

 

 

पण आता अजय देवगणही या सिनेमात महत्त्वाच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. असं समोर येत आहे की, अजय यात भगवान शंकराच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. प्रॉडक्शनहाऊस कडून अजून कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. 2021पासून या सिनेमाचं शुटिंग सुरु होईल. हा सिनेमा हिंदी आणि तेलुगू तमिळ, मल्याळम, कन्नड़ या भाषांमध्येही रिलीज केला जाणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive