By  
on  

येत्या प्रजासत्ताक दिनाला अक्षय कुमार स्टारर ‘सुर्यवंशी’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला ?

    बहुप्रतिक्षित सुर्यवंशी सिनेमा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत. अक्षय कतरिनाची जबदस्त केमिस्ट्री या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे. हा सिनेमा दिवाळीला नाही तर पुढील वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे. 

आता सुर्यवंशी हा सिनेमा पुढील वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला रिलीज होण्याची शक्यता आहे. अक्षय, रोहीत शेट्टी आणि रिलायंस येत्या 26 जानेवारीला हा सिनेमा रिलीज करण्याचा विचार करत आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या तारखेवर अजून शिक्कामोर्तब झालेलं नाही.  ‘83’सोबत क्लॅश न होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं समजत आहे. 83 या ख्रिसमसला रिलीज होण्यासाठी तयार आहे. सुर्यवंशी या पुर्वी 24 मार्चला रिलीज होणार होता. पण लॉकडाऊनमुळे प्रदर्शन पुढे गेलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive