'तान्हाजी'सह हे सिनेमे थिएटर्समध्ये पुन्हा होणार प्रदर्शित, जाणून घ्या

By  
on  

देशभरातील सिनेरसिकांसाठी खुशखबर आहेत, हे आपल्याला काही दिवसांपूर्वीपासून माहिती आहे.. करोना संकट आणि लॉकडाऊनमुळे गेले पाच-सहा महिने ठप्प असलेली सिनेमागृह आता पुन्हा खुली होणार आहेत. केंद्र सरकारनं देशभरात सिनेमागृहं सुरू करण्याची परवानगी दिली असून  १५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेसह चित्रपटगृहं सुरु करण्यास मान्यता दिली आहे. पण सिनेमागृह सुरु झाल्यानंतर . काही सिनेमे पुन्हा सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होणार आहेत.

सिने व्यापार-विश्लेषक तरण आदर्श यांनी यासंदर्भात ट्विट करत पुढील सिनेमांच्या पुर्नप्रदर्शनाची माहिती दिली. अजय देवगणचा 'तान्हाजी : द अनसंग वॉरिअर' हा सिनेमा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सहा हिंदी सिनेमे या आठवड्यात रि-रिलीजसाठी घोषित करण्यात आले आहेत. त्यात तान्हाजीसह मलंग, थप्पड, केदारनाथ, शुभमंगल ज्यादा सावधान आणि वॉर या सिनेमांचा समावेश आहे. 

 

 

हे सिनेमे  पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याने आता प्रेक्षकांचा ह्याला कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

 

 

Recommended

Loading...
Share