सॅंडलवूड ड्रग केसमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयच्या घरी बेंगलुरु पोलिसांनी छापा मारला, मेहुणा आहे आरोपी

By  
on  

बेंगलुरु सेंट्रल क्राईम ब्रांचने आज विवेक ओबेरॉयच्या घरी छापा मारला आहे. सॅंडलवूड ड्रग केसमध्ये विवेकचा मेहुणा आदित्य अल्वा आरोपी आहे. त्याच्या शोधात पोलिसांनी विवेकच्या घरी धाड टाकली आहे. आदित्यच्या विरोधात आरोप दाखल केल्यापासून तो फरार आहे. पोलिस याबाबत बोलताना म्हणतात, ‘ आदित्य अल्वा फरार आहे.

 

विवेक ओबेरॉय त्याचे नातेवाईक असल्याने तो त्याच्या घरी लपला असल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे कोर्टाकडून वॉरंट घेऊन टीम मुंबईमधील त्याच्या घरी गेली होती. सॅंडलवूड ड्रग केसमध्ये एका ड्रग पेडलरने आदित्यचं नाव घेतलं होतं. आदित्य पुर्व मंत्री जीवराज अल्वा यांचा मुलगा आहे. तर विवेक ओबेरायची पत्नी प्रियांका हिचा भाऊ आहे.

Recommended

Loading...
Share