मानुषी छिल्लरने शेअर केला अक्षय कुमारसोबत काम करण्याचा अनुभव

By  
on  

‘बेल बॉटम’ अक्षय पुन्हा एकदा त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये गुंतला आहे.  अक्षयने मानुषी छिल्लरसोबत आगामी ‘पृथ्वीराज’ सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनपुर्वी या सिनेमाच्या काही हिश्याचं शुटिंग संपलं होतं. अलीकडेच या सेटवरून अक्षय आणि मानुषीचा एक फोटो समोर आला आहे.

 

यामध्ये हे दोघंही एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. या सिनेमातील दोघांचाही लूक लीक न होऊ देण्याची खबरदारी घेतली जात आहे. पृथ्वीराजपासून बॉलिवूड डेब्यु करणारी मानुषी म्हणते, ‘पृथ्वीराजच्या सेटवर परत येऊन मला खुप आनंद झाला आहे. मी आता शुटिंगसाठी पुर्णपणे तयार आहे. अक्षयसरांसोबत सेटवर काम करण्याची संधी मिळाल्याने मी खुष आहे. मी त्यांच्याकडून खुप काही शिकले आहे.  अक्षय सरही माझ्या कामाचं कौतुक करताना दिसतात. त्यामुळे मी त्यासाठी कायमच त्यांची आभारी राहीन. याशिवाय मला माझ्या टीममेट्सचही सतत सहकार्य मिळत आहे.

Recommended

Loading...
Share