By  
on  

अभिनेत्री अमृता रावला पुत्ररत्नाचा लाभ

बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव आणि तिचे पती आर.जे अनमोल हे दोघंही आई-बाब झाले आहेत. मिडीया रिपोर्टसुनसार अमृताने रविवारी सकाळी 1 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने त्यांची घरी आनंदाची उधळण झाली आहे. बाळ आणि अमृता दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचं म्हटलं जात आहे.

काही मोजक्या चित्रपटांच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री ‘विवाह’ चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून आता बाळाच्या आगमनाने  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

 

 अमृता आणि अनमोल आपलं खासगीपण जपताना दिसत आहेत. या दोघांनीही गेली 7 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 15 मे 2016 मध्ये लग्न केलं आहे. अमृता अखेरीस बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक ‘ठाकरे’ सिनेमामध्ये दिसली होती.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive