By  
on  

बुर्ज खलिफावर किंग खानचा जलवा, दुबईतही शाहरुखच्या वाढदिवसाचा जल्लोष

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने नुकताच  २ नोव्हेंबर रोजी त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाच्या निमित्ताने जगभरातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सर्व ठिकाणी शाहरुखचीच चर्चा होती. दरम्यान किंग खानचा वाढदिवस दुबईमध्ये देखील जल्लोषात  साजरा करण्यात आला. जगातल्या सर्वात उंच इमारतीवर म्हणजेच जगप्रसिध्द बुर्ज खलिफावर शाहरुखसाठी विशेष रोषणाई करण्यात आली आहे.

दुबईतल्या बुर्ज खलिफा शाहरुखला शुभेच्छा देताना झगमगून गेला. खुद्द शाहरुखनेच हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे.  विशेष म्हणजे शाहरुख हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे, ज्याचे नाव या इमारतीवर लिहिले गेले.

 

 

 

 

“जगातल्या सगळ्यात उंच मोठ्या स्क्रीनवर स्वत:चं छायाचित्र झळकताना पाहणं हा खरंच हा सुंदर क्षण असतो. धन्यवाद बुर्ज खलिफा आणि दुबई, माझ्यावर इतकं प्रेम केल्याबद्दल”, असं म्हणत शाहरुखने हा फोटो शेअर केला आहे. पण बुर्ज खलिफावर शाहरुखला शुभेच्छा देण्यासाठी करण्यात आलेल्या रोषणाईची ही पहिलीच वेळ नाही. अनेकदा शाहरुखला बुर्ज खलिफाकडून अशाप्रकारच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive