By  
on  

नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवानला करोनाची लागण

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचा मुलगा विवान करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले  आहे. विवानने एका इंग्रजी  वेबसाइटला यासंदर्भातील माहिती दिली आहे. “होय, माझी तब्येत बरी नाही कारण मला करोनाची लागण झाली आहे”, असं त्याने स्पष्ट केलं.

विवान शहा हा सध्या क्वारंटाईन असून तो करोनावर उपचार घेत आहे. मागच्याच आठवड्यात विवानमध्ये करोनाची लक्षणं  आढळली होती. 

 विशाल भारद्वाज यांच्या ‘सात खूप माफ’ या चित्रपटातून विवानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर ‘हॅपी न्यू इअर’ या मल्टिस्टारर चित्रपटात त्याने भूमिका साकारली. या चित्रपटात दीपिका पदुकोण, शाहरुख खान यांच्यासोबत स्क्रीन शेअर करत त्याने लक्षवेधी भूमिका साकारली. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive