By  
on  

दिवाळीनंतर सुरु होणार अजय देवगण आणि संजय दत्तच्या ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’च्या शुटिंगला सुरुवात

करोनाच्या प्रकोपामुळे अजय देवगणच्या ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ चं शुटिंग थांबवावं लागलं होतं. आता आठ महिन्यांनी सिनेमाचं कास्ट आणि क्रू पुन्हा एकदा शुटिंगसाठी सज्ज होत आहे. सध्या संजय दत्त, अमी विर्क आणि शरद केळकर शुटिंग करताना दिसतील. 

दिवाळीनंतर अजय टीमला जॉईन करेल. संजयचं शुटिंग पुर्ण झाल्यानंतर सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेहीला पॅचवर्कसाठी बोलावलं जाईल. शुटिंगसाठी सुरक्षित ठिकाणाची निवड केली जात आहे.  संजय सध्या दुबईमध्ये असून दिवाळीनंतर तोही टीमला जॉईन करेल. ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’या सिनेमात अजय देवगण, संजय दत्त, राणा दग्गुबती, सोनाक्षी सिन्हा, परिणीति चोप्रा, नोरा फेतीह, शरद केळकर, अम्मी विर्क आणि प्रणिता सुभाष हे कलाकार झळकणार आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive