By  
on  

अक्षयचा आतापर्यंत कधीही न पाहिलेला अवतार दिसला ‘लक्ष्मी’ च्या या नव्या गाण्यात

‘बुर्ज खलिफा’ नंतर ‘लक्ष्मी’ सिनेमातील आणखी एक नवीन गाणं लाँच झालं आहे. ‘बम भोले’ असं नाव असलेलं गाणं धमाकेदार आहे. या गाण्याचं कंपोझिशन उल्लूमनातीने केलं आहे तर व्हायरसने हे गाणं गायलं आहे. या गाण्यात अक्षय त्याच्या लक्ष्मीच्या गेट अपमध्ये महादेवाच्या मुर्तीसमोर बेभान होऊन नाचताना दिसत आहे. ‘लक्ष्मीच्या भयंकर अशा अवताराला बम भोले या गाण्यातूनजरूर भेटा’. हे कॅप्शन देत अक्षयने हे गाणं चाहत्यांच्या भेटीला आणलं आहे. 

 

 

या सिनेमाचे दिग्दर्शन राघव लॉरेन्सने यांनी केले असून अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत पाहायला मिळतील. ह्या हॉरर कॉमेडीपटात अक्षय व कियारा यांच्यासह तुषार कपूर, शरद केळकर आणि अश्विनी कळसेकर आदी कलाकारांचा अभिनय पाहता येईल. हा सिनेमा येत्या 9 नोव्हेंबरला ओटीटी प्लॅटफॉर्मवर येतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive