By  
on  

मेहंदी फेम अभिनेता फराज खानचं निधन, पूजा भट्टने ट्विट करत दिली माहिती

राणी मुखर्जी स्टारर सुपरहिट सिनेमा मेहंदीमधील अभिनेता फराज  खान याचं निधन झालं आहे. अभिनेत्री पूजा भट्टने त्याच्या निधनाची बातमी ट्विटरवरुन दिली आहे. तो ब-याच काळापासून आजारी होता. जीवन-मरणाशी त्याची झुंज सुरु होती.

आर्थिक चणचणीमुळे उपचारासाठी फराजकडे  पैसे नव्हते. अभिनेता सलमान खानने त्याला उपचारासाठी मदतसुध्दा केली होती. 

फराज बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयात बराच काळ मृत्यूशी झुंज देत होता. त्याला तिसऱ्या स्टेजचा मेंदूचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. पण त्याच्याकडे उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यामुळे अभिनेत्री पूजा भट्टने त्याला आर्थिक मदत करा अशी विनंती देशवासीयांना केली होती. त्यानंतर सलमान खानने त्याला २५ लाख रुपयांची मदत केली असल्याचे म्हटले जाते. 

 

 

 

फराज खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. १९९६ साली ‘फरेब’ या चित्रपटातून त्याने  करिअरची सुरुवात केली होती. त्यांनंतर त्याने ‘पृथ्वी’, ‘दुल्हन बनू में तेरी’, ‘चाँद बुझ गया’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले. तसंच अनेक लोकप्रिय मालिकांमधूनही तो झळकला. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive