By  
on  

बॉलिवूड ड्रग्स प्रकरण : जबाब नोंदविण्यासाठी पुन्हा एकदा दीपिकाची मॅनेजर एनसीबी कार्यालयात दाखल

बॉलिवूड अभिनेता  सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी ड्रग्स प्रकरण समोर आलं. ह्यात बॉलिवूडचे ड्रग्स प्रकरणातले धागेदोरे एनसीबीच्या हाती लागले. याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशला आज पुन्हा एनसीबी कार्यालयात आपला जबाब नोंदविण्यासाठी  एनसीबी कार्यालयात दाखल झाली  आहे.

करिश्माला हे समन्स ह्यापूर्वीच पाठवण्यात आलं होतं. परंतु करिश्माचा काहीच ठाव-पत्ता लागत नव्हता. तसंच तिच्या घरातून अनेक संशियत वस्तू एनसीबीला आपल्या तपासात मिळाल्या आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Celebrity manager #karishmaprakash arrives at NCB office today . #ncbdrugprobe #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

 

ड्रग्स माफियांच्या चौकशीतून करिश्मा प्रकाशचं नाव एनसीबीच्या रडारवर आलं. त्यानंतर मागच्याच महिन्यात दीपिकासोबत करिश्मा  चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर होती. 

एनसीबीने ड्रग्स प्रकरणात अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली. यात दीपिका पादुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुलप्रीत सिंग यांचीही चौकशी करण्यात आली. त्याआधी एनसीबीने दीपिकाची मॅनेजर करिश्माची विशेष चौकशी केली होती. काही दिवसांनी एनसीबीने दुसऱ्यांदा करिश्माला चौकशीसाठी समन्स पाठवला असता तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. तसेच ती चौकशीसाठीही हजर राहिली नाही

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive