By  
on  

BREAKING: अश्लिल व्हिडीओ शूट केल्याप्रकरणी गोवा पोलिसांनी केली पूनम पांडेला अटक

आपल्या फोटो आणि व्हीडिओंमुळे पूनम पांडे ही मॉडेल व अभिनेत्री सतत वादात असते, पूनम पांडे हिने काही दिवसांपूर्वी गोव्यात चापोली धरणावर  अश्लिल व्हीडिओ शूट केला आहे. हा व्हीडिओ पॉर्नसारख्या प्रकारात मोडणारा आहे, असं म्हटलं  जात आहे. हा व्हीडिओ गोव्यात प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओप्रकरणीच गोवा पोलिसांकडून पूनमला अटक करण्यात आली आहे. तसंच चापोली येथे तिचा हा अश्लिल व्हिडीओ शूट होत असताना सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेल्या दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फही करण्यात आलं आहे. 

 लॉकडाऊन काळात गोवा सरकारने हा व्हीडिओ शूट करण्यासाठी कशी परवानगी दिली, असा सवाल आता सरकारला विचारला जात आहे. सर्वसामान्यांना बंदी असताना मॉडेल तिथे कसे पोहोचले, परवानगी कशी मिळाली असा वाद गेले दोन-तीन दिवस सुरुच होता.  

पूनम पांडे दीड महिन्यापूर्वी आपला पती सॅम बॉम्बेसोबत हनीमूनला गोव्यात आली होती. तेव्हा सॅमने आपल्याला मारहाण केली आणि विनयभंग केला अशी तक्रार पूनमने पोलिसात दिली होती. तिच्या विविध उचापतींनी पोलिसांना चक्रावून टाकले आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive