By  
on  

अमृता राव आणि आरजे अनमोल यांच्या मुलाचं नाव जाणून घ्या

अभिनेत्री अमृता राव आणि आरजे अनमोल ही जोडी आई बाब बनले आहेत. अमृताने रविवारी गोंडस मुलाला जन्म दिला. आज सोशल मिडीयावर बाळाची एक झलक शेअर करत तिने बाळाच्या नावाचा खुलासा केला आहे. अमृता आणि अनमोल यांनी वीर असं आपल्या मुलाचं नाव ठेवलं आहे. 

मिडीया रिपोर्टसुनसार अमृताने रविवारी सकाळी 1 नोव्हेंबर रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. छोट्या पाहुण्याच्या आगमनाने अनमोल-अमृताच्या घरी आनंदाची उधळण झाली आहे.

 

 

 

 

काही मोजक्या चित्रपटांच्या माध्यमातून विशेष लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री ‘विवाह’ चित्रपटानंतर खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. मात्र, त्यानंतर तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. परंतु, अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून आता बाळाच्या आगमनाने  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

 अमृता आणि अनमोल आपलं खासगीपण जपताना दिसत आहेत. या दोघांनीही गेली 7 वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर 15 मे 2016 मध्ये लग्न केलं आहे. अमृता अखेरीस बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक ‘ठाकरे’ सिनेमामध्ये दिसली होती.

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive