By  
on  

अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी'मध्ये भाव खाऊन गेला शरद केळकर

ब-याच  दिवसांपासून प्रेक्षक लक्ष्मी या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. तमिळ सिनेमा कांचना हा अधिकृत रिमेक असल्याने प्रेक्षकांना अक्षय कुमारच्या भूमिकेबाबत बरंच अप्रूप होतं. सर्वांना सिनेमा़ प्रदर्शनापूर्वी  फक्त अक्षयच्या भूमिकेची उत्सुकता होती, प्रत्यक्षात मात्र अभिनेता शरद केळकरनेसुध्दा ट्रान्सजेंडरच्या लक्षवेधी भूमिकेतून रसिकांना सरप्राईज दिलं आहे.

अक्षय कुमारच्या लक्ष्मी सिनेमात तो ट्रान्सजेंडर व्यक्तिरेखा हे साकारतोय सर्वांनाच माहित होतं, परंतु शरदच्या या अनपेक्षित सरप्राईजने रसिक सुखावून गेले. खरं तर लक्ष्मी सिनेमाच्या ट्रेलरमध्ये शरद कुठेच दिसला नाही. पण शरद केळकरची भूमिका मात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडली असल्याचे दिसत आहे. अनेकांनी ट्विटरवर शरद केळकरच्या लक्ष्मी या भूमिकेतील फोटो शेअर करत त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. 

भूमिकेचं कौतुक केल्याबद्दल शरदने सर्व चाहत्यांचे आणि सिनेमाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. 

 

 

अजय देवगणच्या तान्हाजी सिनेमात छत्रपती शिवाजी महाराज साकारल्यानंतर पुन्हा एकदा एका चॅलेंजींग भूमिकेतून शरद केळकर भाव खाऊन गेला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive