By  
on  

राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी वाघचा बंटी और बबली 2 रिलीजसाठी तयार?

सिनेमागृह 50 टक्के क्षमतेने का होईना सुरु करण्याची अनुमती मिळाल्यावर अनेक बॉलिवूड सिनेमे रिलीजसाठी सज्ज झाल्याचं दिसत आहे. राणी मुखर्जी, सैफ अली खान, सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शर्वरी वाघचा बंटी आणि बबली 2 देखील लवकरच रिलीज होण्याची शक्यता आहे. 

 

 

हा सिनेमा येत्या ख्रिसमसला रिलीज होण्याची शक्यता आहे. मेकर्सच्या मते ही वेळ रिलीजसाठी सर्वोत्तम आहे. 2005 मध्ये आलेल्या ‘बंटी और बबली’ सिनेमाचा हा रिमेक आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन, अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी होते. या सिनेमात कजरा रे कजरा रे गाण्यात अभिषेकची पत्नी ऐश्वर्या झळकली होती. अभिनेत्री शर्वरी वाघचा हा पहिलाच सिनेमा आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive