By  
on  

सोनू सूदच्या पुस्तकाचं कव्हर पेज होतंय व्हायरल…

म्हणतात ना, माणसांत पण देव असतो. बॉलिवूड अभिनेता सोनू सूद ने अवघ्या जगाला हे दाखवून दिलं आहे. रिअल हिरोची उपाधी तो सार्थ ठरवतोय. लॉकडाऊनच्या काळात हजारो प्रवासी मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूदचं मदत कार्य विविधप्रकारे सुरुच आहे. त्यामुळे तो आपसूकच चर्चेत येतो. त्याला प्रसिध्दीचा कुठलाही हव्यास नाही. तो मनापासून गरजूंची मदत करतो, हेच वेळोवेळी पाहायला मिळतं. 

अनेकांना रोजगार मिळवून देणं. गरीब विद्यार्थांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणं ,अशा त्याच्या या दानशुरपणाची सर्वत्र स्तुती होते.. दरम्यान लोकांची मदत करताना आलेले विविध अनुभव सोनू एका पुस्तकाच्या माध्यमातून सर्वांना सांगणार आहे. 

सोनू सूदचं एक नवं पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. आय एम नॉट मसिहा (मी तारणहार नाही) असं या पुस्तकाचं नाव आहे. येत्या डिसेंबर महिन्यात हे पुस्तक प्रकाशित होणार आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

 

 

करोना काळात लोकांची मदत करताना आलेले अनुभव सोनू या पुस्तकातून सांगणार आहे. हे पुस्तक वाचणाऱ्या व्यक्तीला प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा मिळेल असा विश्वास त्याला आहे.

 “ लॉकडाऊन काळात शेवटचा मजूर आपल्या घरी पोहोचेपर्यंत मी शांत बसणार नाही.” असं सोनूने एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive