By  
on  

मेगास्टार चिरंजीवीला करोना झालाच नाही ! तो रिपोर्ट चुकीचा, वाचा सविस्तर

काही दिवसांपुर्वीच मेगास्टर चिरंजीवी यांनी ट्विटरद्वारे त्यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगितलं होतं. यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेची लहर होती. पण आता एक आनंदाची बातमी आहे. 
चिरंजीवी यांना करोनाचा संसर्ग झालाच नसल्याचं समोर आलं आहे. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येऊनही चिरंजीवी यांना कोणतीच लक्षणं नव्ह्ती.

 

 

त्यामुळे तीन वेगवेगळ्या टेस्टमध्ये त्यांचा रिपोर्ट करोना निगेटिव्ह आला आहे. पहिल्यांदा पॉझिटिव्ह आलेला रिपोर्ट हा सदोष किटमुळे आला असल्याचं समोर आलं आहे. ही बाब त्यांनी चाहत्यांशी शेअर केली आहे. यासोबतच त्यांनी चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनेसाठी आभार मानले आहेत. तरीही गेल्या 5 दिवसात संपर्कात आलेल्या लोकांनी काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive