By  
on  

'हिरोच्या बायकोला मी खटकले म्हणून मला सिनेमातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला'

पिंक, 'थप्पड', 'मिशन मंगल', आणि 'बदला' या चित्रपटांमुळे तापसी पन्नू आज यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.  आज तापसीला सिनेइंडस्ट्रीत काम करुन तब्बल 10 वर्ष पूर्ण होत आहेत. 

तापसीने आपल्या सिनेकारकिर्दीची सुरुवात तमिळ आणि तेलगु इंडस्ट्रीपासून केली. आज तापसीकडे सर्वकाही आहे. मोठमोठे सिनेप्रोजेक्टस आहेत. तसंच बड्या निर्मात्यांना तिने त्यांच्या चित्रपटात काम करावं अशी इच्छा आहे. 

पण एककाळ असाही होता, जेव्हा तापसीकडे फ्लॉप  म्हणून पाहिले जायचे. निर्माते तिला आपल्या चित्रपटांमध्ये घेण्यासाठी फारसे उत्सुक नसायचे. तिच्या कामावर कोणीच खुश नव्हते .याच बाबत एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत तापसी सांगते, “ करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला बरेच विचित्र अनुभव आले. मी चांगली दिसत नाही म्हणून मला सिनेमातून काढून टाकण्यात आलं. हिरोच्या पत्नीला मी आवडले नव्हते म्हणून मला बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. तसंच एकदा मी माझ्या सिनेमाचं डबिंग करत होते. तर हिरोला माझा डायलॉग पसंत पडला नाही म्हणून मला तो बदलण्याची गळ घालण्यात आली, परंतु मी त्याला नकार दिला. तेव्हा निर्मात्यांनी दुस-या डबिंग आर्टिस्टकडून तो बदलवून घेतला. असाही एक काळ होता, जेव्हा हिरोचा आधीच चित्रपट चालला नाही म्हणून बजेट कंट्रोलच्या नावाखाली मला मानधनात कपात करायला सांगण्यात आले" 

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive