By  
on  

प्रभास - सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

 ‘तानाजी:द अनसंग वॉरिअर’, 'लोकमान्य' फेम दिग्दर्शक ओम राऊत आता आदिपुरुष  हा भव्य-दिव्य सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या सिनेमात सुपरस्टार प्रभास श्रीरामाची व्यक्तिरेखा साकारत आहे. 

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’मध्ये सैफ उद्यभान राठोड ह्या खलनायकी भूमिकेत दिसला होता. आता आगामी ‘आदिपुरुष’मध्ये सैफ लंकाधिपती रावण साकारतोय. पुन्हा ही खलनायिकी भूमिका त्याला  मिळतेय. 

 प्रभास या सिनेमात प्रभू रामचंद्राच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे रावण साकारणा-या सैफ सोबत दोघांच्या अभिनयाची जुगलबंदी पाहणं औत्सुक्याचं ठरेल. स्वातंत्र्यदिनाच्या आठवड्यात हा सिनेमा प्रदर्शित होतोय. 

प्रभासने आपल्या इन्स्टाग्रामवरुन आदिपुरुष सिनेमाची रिलीज डेट जाहीर केली आहे. पुढच्याच्या पुढच्या वर्षी म्हणजेच 2022 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.  तर पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2021 मध्ये ह्या सिनेमाचं शूटींग सुरु होत आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

 

 

'आदिपुरुष'  हा ओम राऊत स्टाईल जबरदस्त एक्शन- ड्रामा सिनेमा असणार आहे यात शंका नाही. भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. ११ ऑगस्ट  २०२२ मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive