शाहरुख खानच्या ‘पठान’मध्ये एजंटच्या भूमिकेत दिसणार दीपिका पदुकोण

By  
on  

2 वर्षांनंतर शाहरुखने आगामी पठानच्या शुटिंगला सुरुवात केली आहे. यावेळी तो लाँग हेअर आणि बेअर्ड लूकमध्ये दिसून आला. या सिनेमात जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोणही दिसणार आहे. यानंतर दीपिकानेही ‘शुभारंभ’ अशी पोस्ट करत पठानच्या शुटिंगला शुभारंभ केला होता. दीपिका सध्या शकुन बत्राच्या सिनेमाचं शुटिंग सुरु करते आहे.

 

दीपिका डिसेंबरच्या मध्यावर या टीमला जॉईन करेल. दीपिका या सिनेमात एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. शाहरुखला एका मिशनसाठी ती जॉईन करताना दिसेल.  दीपिकाचा अ‍ॅक्शनपॅक्ड अंदाज दिसेल. या सिनेमातील आणखी एक चेहरा म्हणजे जॉन अब्राहम. जॉन येत्या दोन दिवसात शाहरुख आणि दीपिकाला जॉईन करेल. पठानचं दुसरं शेड्युल अबुधाबीला आहे.

Recommended

Loading...
Share