अबब ! अनुष्का शर्माचं बेबी बंपसोबत शीर्षासन पाहिलंत का?

By  
on  

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या सेलिब्रिटी कपलच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. ही गोड बातमी विराटने सोशल मिडीयावरुन फोटोसकट शेअर करताच ती वा-यासारखी जगभर पसरली. आता प्रेगन्सीमध्येसुध्दा अनुष्का सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. अनुष्काने नुकताच एक फोटो पोस्ट केला असून यामध्ये ती चक्क शीर्षासन करताना दिसत आहे. बेबी बंपसोबत अनुष्काने केलेला हा शीर्षासन सध्या सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधूनच घेत नाही तर थक्क करतोय. 

भिंतीचा आधार घेऊन अनुष्काने शीर्षासन केलं असून पती विराट कोहलीने तिच्या पायांना आधार दिला आहे. योगमार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली अनुष्काने हे शीर्षासन केलं आहे.

 

अनुष्का लिहते, " ‘हा सर्वांत अवघड व्यायामाचा प्रकार आहे. योगसाधना माझ्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. गरोदर असण्यापूर्वी मी जी काही योगासनं करत होती, ती सर्व आता गरोदर असतानाही करू शकते असं माझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं. एका विशिष्ट टप्प्यानंतर खूप पुढेपर्यंत वाकण्याचे व्यायाम आणि ट्विस्ट्स वगळता आवश्यक आधारसह मी योगासनं करू शकते. शीर्षासन मी गेल्या अनेक वर्षांपासून करतेय. भिंतीच्या आधारे मी हे करू शकले आणि सुरक्षेच्या कारणास्तव माझ्या पतीने मला आधार दिला. हे सुद्धा माझ्या योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करू शकले, जे पूर्ण वेळ माझ्यासोबत ऑनलाइन जोडले गेले होते. माझ्या गरोदरपणातही मी योगासनं करू शकते याचा मला खूप आनंद आहे."

Recommended

Loading...
Share