आदित्य नारायण आणि श्वेताच्या रिसेप्शन पार्टीत गोविंदासह भारती सिंह, हर्ष आणि इतर सेलेब्रिटींनी लावली हजेरी

By  
on  

उदित नारायण यांचा मुलगा गायक आदित्य नारायण 1 डिसेंबर रोजी त्याची लाँग टाइम गर्लफ्रेंड श्वेता अग्रवालसोबत लग्नबंधनात अडकला. आदित्यने  मुंबईतील इस्कॉन टेम्पलमध्ये त्यांचं कुटुंब आणि काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित हे लग्न केलं. याशिवाय नुकतच आदित्यने त्याच्या जवळच्या मित्रमंडळींसाठी खास रिसेप्शन सोहळाही आयोजीत केला होता. यावेळी अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती पाहायला मिळाली.

या रिसेप्शनसाठी आदित्य आणि श्वेताच्या परिवारांनी कुटुंब आणि मित्रमंडळींसोबत खास फोटोसेशनही केले. सध्या या रिसेफ्शनचे काही खास फोटो सोशल मिडीयावर चर्चेत आहेत. यावेळी आदित्य काळ्या रंगाच्या सुटाबुटात दिसला. तर श्वेताने लाल रंगाचा गाउन परिधान केला होता. यावेळी खास डान्स परफॉर्मन्सही झाले. यावेळी आदित्यनेही परफॉर्म केलं.

आदित्यचे वडिल गायक उदित नारायण यांनी रिसेप्शन सोहळ्यात विविध गाणी गाऊन सोहळ्याची शोभा वाढवली. यावेळी त्यांची पत्नी दीपादेखील सोबत होती. यावेळी मंचावर आदित्यने साजनजी घर आये गाण्यावर धमाल केली. या रिसेप्शनसाठी अनेक कलाकार मंडळी देखील उपस्थित होते.

 

अभिनेता गोविंदा आणि त्यांचा परिवारही या सोहळ्यासाठी उपस्थित होते. याशिवाय आदित्यचे खास मित्र हर्ष लिम्बाचिया आणि भारती सिंह देखील या सोहळ्याला हजर होते.

 

Recommended

Loading...
Share