‘थलैवा’ रजनीकांत आता राजकारणात दम आजमावणार, लढवणार तामिळनाडूची निवडणूक

By  
on  

सुपरस्टार रजनीकांतने त्याच्या राजकिय प्रवेशाची घोषणा केली आहे. रजनीकांतने ट्वीटरवरून ही घोषणा केली आहे. तामिळनाडूच्या निवडणूकांदरम्यान रजनीकांत सक्रिय असणार आहे. आपल्या ट्वीटमध्ये रजनीकांत म्हणतो, ‘येत्या विधानसभा निवडणूकांमध्ये जनतेच्या सपोर्टमध्ये आम्ही जिंकून एक प्रामाणिक, भ्रष्ट नसलेलं, पारदर्शी सरकार स्थापन करू’.

 

 

‘रजनीकांतने यापुर्वीच आपल्या राजकारण प्रवेशाबाबत स्पष्ट केला आहे. त्यात तो म्हणतो, ‘ माझा राजकारणातील प्रवेश निश्चित आहे. मी स्वत:ची पॉलिटिकल  पार्टी सुरु केली आहे.’ रजनीकांतचं दाक्षिणात्य सिनेमातील स्थान पाहता त्याच्या पक्षाला पदार्पणातच जोरदार सपोर्ट मिळेल यात शंका नाही.

Recommended

Loading...
Share