लिज्जत पापडची यशोगाथा आशुतोष गोवारीकर घेऊन येणार सिनेमारुपात, ही अभिनेत्री साकारतेय नायिका

By  
on  

बॉलिवूडला  ‘लगान’, ‘स्वदेस’, ‘जोधा अकबर’ असे एकापेक्षा एक चित्रपट देणारे मराठमोळे दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारीकर. बॉलिवूडमधील आघाडीच्या दिग्दर्शकांपैकी एक असणारे आशुतोष लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. त्यांचा हा आगामी चित्रपट लिज्जत पापड या प्रसिद्ध ब्रॅण्डच्या यशोगाथेवर आधारित आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्री झळकणार असल्याचं समजतंय.

 ‘कर्रम कुर्रम’ असं या सिनेमाचं नाव आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आशुतोष  महिला सबलीकरण आणि सशक्तीकरणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहेत. या चित्रपटात अभिनेत्री कियारा आडवाणी प्रमुख भूमिका साकारत असल्याचं बोललं जात आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

 

लिज्जत पापड या उद्योगसमुहाची सुरुवात एका सामान्य गृहिणीने केली आणि त्यानंतर खुप मोठा असा या व्यवसायाचा डोलारा उभा राहिला,  या चित्रपटाचं दिग्दर्शन ग्लेन बरेटो आणि अंकुश मोहला करणार असून सुनिता गोवारीकर या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

दरम्यान, जुग जुग जियो या सिनेमाच्या चित्रीकरणात कियारा सध्या व्यस्त आहे. तर लवकरच तिचा इंदू की जवानी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येतोय. त्यामुळे ती लवकरच ‘कर्रम कुर्रम’च्या शूटींगला सुरुवात करु शकते असा अंदाज व्यक्त होत आहे, 

Recommended

Loading...
Share