By  
on  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रजनीकांत यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

थलैवा सुपरस्टार रजनीकांत यांचा आज १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. रजनीकांत यांचा हा ७० वा वाढदिवस आहे. रजनीकांत यांचं खरं नाव शिवाजी गायकवाड. रजनीकांत यांनी त्यांची स्टाइल आणि अभिनयाने लाखो-करोडो चाहत्यांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे.. जगभरात त्यांचे चाहते असल्याचे पाहायला मिळते.

आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक कलाकारापर्यंत सर्वांनीच रजनीकांत यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रजनीकांत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदीजी ट्विटमध्ये शुभेच्छा देताना म्हणतात,  ‘प्रिय रजनीकांत तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुम्हाला सदैव निरोगी ठेवो’ .

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive