या अभिनेत्रीकडून रितेश देशमुखला मिळाल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा

By  
on  

अभिनेता रितेश देशमुखवर वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मिडीयावर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितेशला त्याच्या 42 व्या वाढदिवसानिमित्ताने आणखी एका खास व्यक्तिने शुभेच्छा दिल्या आहेत. ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ती आहे बॉलिवुडची सौंदर्यवती धकधक गर्ल माधुरी दीक्षित. 

माधुरीने रितेश देशमुखसाठी सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे. माधुरीने रितेशला मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. माधुरीने एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत माधुरी सोबत रितेश आणि अभिनेता अनिल कपूरदेखील दिसत आहेत.

 

माधुरी या पोस्टमध्ये लिहीते की, "माझी दोन आवडती माणसं एकाच फ्रेममध्ये. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला रितेश. देव तुला खूप प्रगती आणि आनंद देवो."  या पोस्टमधून रितेश आणि अनिल कपूर हे माधुरीचे आवडते कलाकार आहेत हे देखील पाहायला मिळतय. सोशल मिडीयावर या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे. यासह अनेक कलाकारांनी रितेशचे फोटो पोस्ट करून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Recommended

Loading...
Share