By  
on  

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील या प्रसिध्द अभिनेत्याला ओळखू शकता का?

छत्रपती शिवाजी महाराज पडद्यावर साकारणं आणि ती भूमिका जिवंत करण हे अभिनेत्यासाठी खुप आव्हान असतं. त्याचसोबत या ऐतिहासिक भूमिकेसाठी योग्य पात्राची निवड करणं हेसुध्दा मोठं जोखमीचं काम आहे. सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडमधील एका कलाकाराचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील फोटो प्रचंड चर्चेत आहे. पण हा अभिनेता नक्की कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सर्वांचा आवडता  आर. माधवन आहे.

आर. माधवनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये आर माधवन वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील त्याच्या या  लूकने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. 

 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by R. Madhavan (@actormaddy)

 

हे फोटो शेअर करत आर. माधवनने ‘मला न मिळालेले रोल. यातील कोणत्या रोलसाठी मी योग्य होतो आणि यातील कोणता रोल मला चांगला वाटला नसता?’ असं कॅप्शन दिलं आहे. 

पण माधवनच्या ह्या फोटोवर मात्र चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive