By  
on  

हॅक झाल्यानंतर रिस्टोर झालं उर्मिला मातोंडकरचं इन्स्टाग्राम अकाउंट, अजूनही उर्मिलाच्या काही पोस्ट मिसिंग

नुकतच अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने मुंबई पोलीसच्या सायबर यूनिटला एका अज्ञात व्यक्तिच्या विरोधात एफआयआर दाखल केली होती. उर्मिलाने तिचा इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केली होती. आणि आता उर्मिलाचा इन्स्टाग्राम अकाउंट रिस्टोर करण्यात आला आहे. उर्मिलाने या विषयी स्वत: सोशल मिडीयावर सांगितलं आहे.

अकाउंट पुन्हा रिस्टोर झाल्यानंतर उर्मिलाने ट्विट केलं की, "मी इन्स्टाग्रामवर परत आली आहे. आणि सहकार्यासाठी मुंबई पोलीस आणि इन्स्टाग्रामचे धन्यवाद.तरी माझ्या काही जुन्या पोस्ट अजूनही गायब आहेत." असं बोललं जातय की हॅकरने तुर्की देशातील आईपीचा वापर करून हे हॅकिंग केलं होतं. जो कुणी हॅकर आहे तो तुर्की देशातील आहे किंवा त्याने तुर्की देशातील आईपी एड्रेसचा वापर स्वत:ची ओळख लपवण्यासाठी केला आहे. 

 

उर्मिलाने तिच्या स्टेटमेंटमध्ये पोलीसांना सांगितलं होतं की, "मला इंटरनेटचा वापर करणं चांगलं माहिती आहे. माझं इन्स्टाग्राम सोशल साईटवर अकाउंट आहे. ज्याचा वापर मी माझ्या मोबाईलवरून करते. 16 डिसेंबरला एका अज्ञात व्यक्तीने माझ्या मोबाईलवर लिंक पाठवली आणि मला इन्स्टाग्राम लॉगइन करायला सांगीतलं. आणि मी त्या लिंकवर क्लिक करून लॉगइन केलं. ज्यानंतर मी माझा इन्स्टाग्राम पासवर्ड रिसेट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मला मेसेज आला की पासवर्ड रिसेट करण्यासाठीची लिंक माझ्या मोबाईलवर पाठवली आहे. मात्र ती लिंक दुसऱ्याच नंबरवर गेली. जे वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झालं आहे."

 उर्मिला मातोंडकरने नुकताच शिवासेना पक्षात प्रवेश केला आहे. याआधी उर्मिला काँग्रेस पक्षात होती.

Recommended

PeepingMoon Exclusive