By  
on  

खरं की काय? प्रेग्नेन्सीमध्येसुध्दा ट्रे़डमीलवर धावतेय अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल

बॉलिवूडचं प्रसिध्द सेलिब्रिटी कपल अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ह्यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. अनुष्काच्या प्रेग्नन्सीदरम्यानचे प्रत्येक अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. अनुष्का प्रचंड फिटनेस फ्रिक आहे. ती गरोदरपणातही आपल्या फिटनेसकडे जातीने लक्ष देताना पाहायला मिळते. हेल्दी राहण्यासाठी ती विशेष प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वीच गरोदरपणात अनुष्काचा शिर्षासन करतानाचा एक फोटो व्हायरल झाला होता त्यानंतर आता अनुष्काच्या एका व्हायरल व्हिडीओने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 

 

 

 

सोशल मीडियावर व्हायरल होत असेलला व्हिडीओ अनुष्काच्या एका फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अनुष्का ट्रेड मीलवर चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे कमी कालावधीत तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी तिच्या ह्या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव सुरु केला आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive