By  
on  

'बिग बॉस 14'च्या टॅलेंट मॅनेजर तरुणीचं सेटच्या बाहेरच अपघाती निधन

'बिग बॉस 14' हा सध्या टेलिव्हिजनवरचा सर्वा लोकप्रिय शो आहे. या शोची यंदा बरीच चर्चा रंगली. पण या शोच्या कार्यक्रमातून एक दु:खद बातमी नुकतीच समोर आली आहे. या सेटवर काल रात्री मोठा अपघात घडला. या शोची टॅलेंट मॅनेजर म्हणून कार्यरत असलेली पिस्ता धाकड ही तरुणी या अपघातात मृत्यू पावली आहे. 

काल रात्री विकेंडचा वारसाठी या शोची टीम फिल्मसिटीमघ्ये शूटींग करत होती. शूटींग संपल्यानंतर रात्री उशिरा ही तरुणी आपल्या एका सहकारी मेत्रिणीसह एक्टिव्हा स्कूटरवरुन घरी जाण्यास निघाली. पण रात्रीच्या काळोखात त्यांची स्कूटर एका खोल खड्डयात कोसळली आणि रुतून बसली. स्कूटरवरुन या दोघीही तरुणी पडल्या आणि त्यातच एकीचा जागीच मृत्यू झाला. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive