By  
on  

पाहा Video : सारा अली खानने डेंटिस्टकडे जाऊन काढला दात, शेयर केला गमतीशीर व्हिडीओ

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सोशल मिडीयावर काहीना काही विनोदी व्हिडीओ शेयर करत असते. अनेकदा तिने शेयर केलेले व्हिडीओ चर्चेत राहिले आहेत. साराने नुकताच शेयर केलेला व्हिडीओही सध्या चर्चेत आला आहे. 

सारा नुकतीच डेंटिस्टकडे गेली होती. जिथे तिने तिची अक्कल दाढ काढली. यावेळी दात काढण्याासठी सारा डेंटिस्टकडे गेली होती. आणि याच दरम्यानचा व्हिडीओ तिने शेयर केला आहे. दात काढताना आणि काढल्यानंतरचा हा कॉमेडी व्हिडीओ तिने शेयर केला आहे. सारा या पोस्टमध्ये लिहीते की, "नमस्कार प्रेक्षकहो, अक्कल दाडला बाय बाय."  या व्हिडीओत ती काढलेले दात दाखवतानाही दिसतेय. साराचा हा कॉमेडी व्हिडीओ अनेकांना आवडलाय.

 

 साराच्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर लवकरच 'अतरंगी रे' या सिनेमातून सारा अक्षय कुमार आणि धनुषसोबत झळकणार आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive