By  
on  

अखेर आमीरच्या लेकीने दिली कबुली, करते आहे याला डेट

आमीरची लेक इरा खानने अफवांना पुर्ण विराम देत बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. काल झालेल्या प्रॉमिस डे चं निमित्त साधत इराने ही बाब शेअर केली आहे. ‘तुला वचन देणं हे माझं सौभाग्य आहे’ या आशयाचे कॅप्शन इराने दिलं आहे. त्याचसोबत तिने ‘myvalentine’ असा हॅशटॅगही वापरला आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

 

अलीकडेच इरा आणि नुपुरने अलिबाग येथील कझिनच्या लग्नातही एकत्र हजेरी लावली होती. इराची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. लॉकडाऊनपासूनच या जोडीच्या नात्याची चर्चा सुरु होती. अलीकडेच दोघांनी महाबळेश्वर इथल्या आमिर खानच्या फार्महाऊसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतला. इराने नुपूरची ओळख आई रिना दत्ता यांच्याशी करून दिली होती.

Recommended

PeepingMoon Exclusive