By  
on  

शिल्पा शेट्टीने लेकीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शेअर केला हा व्हिडियो

अभिनेत्री शिल्पा शेट्टी लेक समिषाबाबत अनेकदा पोस्ट शेअर करत असते. यावेळी मात्र खास कारणास्तव तिने समिषाचा एक व्हिडियो शेअर केला आहे. शिल्पाची लेक समिषा एक वर्षाची झाली आहे. त्यानिमित्ताने शिल्पाने तिचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. आतापर्यंत शिल्पाने समिषाचा कोणताही व्हिडियो शेअर केला नाही.

 

 

पण या क्युट व्हिडियोने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. ‘मम्मा हे तुझ्या तोंडून ऐकणे हे माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… हे कॅप्शन शिल्पाने या व्हिडियोला दिलं आहे. व्हिडीओमध्ये समिषा अतिशय क्यूट दिसत आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive