By  
on  

लाल रंगाच्या साडीत नवी नवरी दीया मिर्झा दिसली इतकी सुरेख, पाहा फोटो

अभिनेत्री दीया मिर्जा नुकतीच लग्नाच्या बेडीत अडकली आहे. पती वैभव रेखीसोबत नुकतीच तिने कॅमेरासमोर पोझ दिली आहे. या लग्नसमारंभाला मोजक्याच पाहुण्यांची उपस्थिती होती. वैभव आणि दीया लॉकडाऊनपासून एकमेकांना डेट करत आहेत. वैभव बिझनेस मॅन आहे. दीयाने अलीकडेच तिच्या मेहंदी सेरेमनीचा फोटो शेअर केला होता. 

 

 

दीयाने लग्नात लाल बनारसी साडी नेसली आहे. गजरा, चोकर आणि बिंदी यामुळे तिच्या लूकला चार चांद लागत आहेत. तर वैभवने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता जॅकेट आणि गोल्डन कलरचा फेटा घातला आहे. काही दिवसांपुर्वीच ती प्री वेडिंग पार्टीमध्ये दिसली होती. शाहरुख खानची मॅनेजर आणि पुजा ददलानी एक पार्टी आयोजित केली होती. यावेळी वैभव आणि दीया ही जोडी दिसून आली.

Recommended

PeepingMoon Exclusive