By  
on  

सुशांत सिंह राजपूतसोबत काम केलेल्या अभिनेत्याची आत्महत्या, शेअर केली सुसाईड नोट

मनोरंजनविश्वाला आत्महत्यांचं लागलेलं गालबोट अद्याप तसंच आहे. आणखी एका अभिनेत्याने आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी या सिनेमात सुशांत सिंग राजपूतसोबत झळकलेला अभिनेता संदीप नाहर याने मंगळवारी आत्महत्या केल्याची घटना घडलीय . तसंच अक्षय कुमारसोबत ‘केसरी’ (Kesri) चित्रपटात आणि अनेक टीव्ही मालिकांमध्येही संदीप विविध भूमिकेत झळकला होता.

मुंबईत गोरेगावमधील राहत्या घरात संदीपचा मृतदेह आढळला. आत्महत्येपूर्वी संदीपने फेसबुकवर एक व्हिडिओ आणि सुसाइड नोट शेअर केली. याप्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive