करिनाने दुस-या प्रेग्नंसीची बातमी शेअर केल्यानंतर तैमुरला भाऊ मिळणार की बहिण याची उत्सुकता होती. ही उत्सुकता आता संपली आहे. करिनाने दुस-या मुलाला जन्म दिला आहे. 21 फेब्रुवारी म्हणजे आजच करिनाने बाळाला जन्म दिला आहे. करिना डिलीव्हरीसाठी काल ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल झाली होती. करिना सैफने 2016 मध्ये पहिल्या बाळाचं स्वागत केलं होतं.