By  
on  

अजय देवगणने केली ‘गंगूबाई काठियावाडी’च्या शुटिंगला सुरुवात

नुकताच संजय लीला भन्साळींचा आगामी सिनेमा गंगूबाई काठियावाडीचा ट्रेलर समोर आला आहे. या सिनेमातील आलियाच्या अदाकारीचं चाहते कौतुक करत आहेत. या सिनेमासोबत आणखी एक सुपरस्टार जोडला जाणार आहे. पीपिंगमूनने यापुर्वी सांगितल्याप्रमाणे अजय देवगण या सिनेमात एक्सटेंडेड कॅमिओ करणार आहे. अजय या महिनाखेरीस शुटिंगला सुरुवात करेल.

 

 

अजय यात करीम लालाच्या व्यक्तिरेखेत दिसतो आहे. करीम लाला मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील मातब्बर नाव होतं. करीम लाला हा मुंबईतील पठाणांचा गॉडफादर होता. अजयचं या शूटचं 10 ते 12 दिवसांचं शेड्युल आहे. हुसेन जैदी यांच्या 'माफीया क्वीन्स ऑफ मुंबई' तीला एका प्रकरणामध्ये गंगुबाई कोठेवालीचा उल्लेख आहे. अजय देवगण आणि संजय लीला भन्साळी या सिनेमाच्या निमित्ताने जवळपास दोन दशकानंतर एकत्र येत आहेत.

Recommended

PeepingMoon Exclusive