By  
on  

परिणीती चोप्रा स्टारर ‘साईना’चा टीजर आला समोर, या दिवशी होणार रिलीज

परिणीती चोप्रा बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालच्या बायोपिकमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा टीजर समोर आला आहे. या पाठोपाठ परिणीतीने तिच्या आगामी सिनेमाची तारीखही समोर आली आहे.सायना हे या बायोपिकचं नाव आहे. या टीजरमध्ये खेळाभोवताल फिरणार खेळाडूचं विश्व दिसून येतं. ‘सामने कोई भी हो, मै तो बस मार दूंगी’ हा डायलॉगही परिणीतीच्या तोंडी दिसतो.

 

 

सायनाचा पुर्ण लूक या टीजरमध्ये दिसत नसला तरी खेळाबाबतचं पॅशन सीनमध्ये जाणवत राहतं. अभिनेत्री श्रद्धा कपूर या सिनेमात सायना साकारणार होती. मात्र कालांतराने काही कारणास्तव श्रद्धाऐवजी परिणीतीला कास्ट करण्यात आलं. या भूमिकेसाठी परिणीती गेल्या अनेक दिवसांपासून मेहनत घेतेय. परिणीतीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर काही फोटो अपलोड केले होते. हा सिनेमा 26 मार्च 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive