By  
on  

बॉलिवूडच्या या प्रसिध्द गायिकेने दिली गुड न्यूज, बेबी बंपसोबत फोटो केला शेअर

अनेक सेलिब्रिटींच्या घरात यंदा लॉकडाऊन काळात पाळणा हलला आहे. मराठी मनोरंजनविश्व असो किंवा मग बॉलिवूड सर्वांनीच चाहत्यांना गोड बातमी दिली आहे.  यात विरुष्का आणि सैफिनाच्या घरी तर चिमुकल्या पाहुण्यांचं आगमनही झालंय. तर अनेक टेलिव्हिजनवरील कलाकार या काळात आई-बाबा झाले आहेत.

 आता सगळ्यांची फेव्हरेट आणि बॉलिवूडची प्रसिध्द पार्श्वगायिका श्रेया घोषालने तिच्या चाहत्यांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केलीय. श्रेयाच्या घरी देखील लवकरच छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत श्रेयाने चाहत्यांसोबत ही गुड न्यूज शेअर केलीय.

 

 

”बेबी श्रेयादित्य लवकरच येत आहे. शीलादित्या आणि मला ही बातमी तुमच्या सोबत शेअर करताना आनंद होतोय. आम्ही आयुष्यातील नव्या आध्यायाची सुरूवात करत आहोत. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम याची आम्हाला गरज आहे” असं कॅप्शन देते श्रेयाने तिचा बेबी बंपसोबतचा फोटो शेअर केला आहे. 

2015 मध्ये श्रेया घोषालने प्रियकर शिलादित्यसोबत विवाह केला. पतीचं नाव शिलादित्य असल्याने श्रेयाने कॅप्शनमध्ये येणाऱ्या बाळाचा ‘श्रेयादित्य’ असा उल्लेख केला आहे. 

संपू्ण मनोरंजनविश्वातून श्रेयावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive