By  
on  

‘सायना’च्या पोस्टवरून ट्रोल करणा-यांना अमोल गुप्ते यांनी खरमरीत शब्दात सुनावलं

बॅडमिंटनपट्टू सायना नेहवालचा बायोपिक ‘सायना’ चं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. पण या पोस्टरवरुन नेटिझन्सनी सिनेमाला खुप ट्रोल केलं आहे. या सिनेमाचं पोस्टरमध्ये असलेलं शटल सर्व्हिससाठी हवेत उडवण्यात आल्याचं भासवण्यात आलं आहे.  पण बॅटमिंटनमध्ये अशी सर्व्हिस कधीही केली जात नाही. नेटिन्सनी अशा प्रकारे या सिनेमाला ट्रोल केलं आहे.

यावर दिग्दर्शक अमोल गुप्ते ट्रोलर्सवर चांगलेच उखडले आहेत. या पोस्टरबाबत ते म्हणतात, ‘जर सायना ते वर उडणारं शटल आहे तर हे सरळ आहे की राष्ट्रध्वजातले रंग असलेला तो रिस्टबँड आणि त्या मुलीचा हात म्हणजे सायना आज ज्या यशोशिखरावर आहे तिथपर्यंत पोहोचण्याची आकांक्षा बाळगणाऱ्या भारतीय मुलीचा हात आहे. राहुल नंदा यांनी उत्तम संकल्पनेतून हे पोस्टर तयार केलं पण दुर्दैवाची गोष्ट ही की, घाईघाईत प्रतिक्रिया देणाऱ्या या जगाला एवढ्या सविस्तरपणे समजावून सांगावं लागत आहे. काहीही बोलण्यापूर्वी विचार का करत नाही…विचार करा.’ भुषण कुमार यांची निर्मिती असलेला हा सिनेमा 26 मार्च 2021 ला प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.

Recommended

PeepingMoon Exclusive